राधामोहन सिंगाना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकला – राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी आत्महत्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्यावर आता चहू बाजूने टीका होत आहे. राधामोहन सिंग यांनी केलेल्या विधानावरून त्यांची लायकी दिसून येत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यानी केली आहे, तसेच असे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.

देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सरकारमधील मंत्र्यांना याच काहीही गांभीर्य नसल्याच दिसत आहे. बळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याच काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे. शेतकऱ्यांच आदोलन ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे.

दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून दहा दिवस संपाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाविषयी पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले. त्यावर माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, असल्याच उत्तर त्यांनी दिलं. देशभरात बारा ते चौदा कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत ५०० ते १००० शेतकरी असतील आणि त्यांना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तरी करावं लागतं, असंही ते म्हणाले.