खासदार राजू शेट्टींना ‘सुगीचे दिवस’; गेहलोतांच्या शपथविधीवेळी मानाचं पान

टीम महाराष्ट्र देशा – राजस्थानात वसुंधरा राजेंचं तख्त पालटविल्यानंतर कॉग्रेसचे अशोक गेहलोत सिंहासनावर विराजमान झाले. गेहलोत यांच्या आज पार पडलेल्या शपथविधीवेळी कॉग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रीयसह प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर लक्षवेधी उपस्थित ठरली खासदार राजू शेट्टींची. मंचावर दुसऱ्या रांगेत राजू शेट्टींना स्थान देण्यात आले होते. शेतकरी प्रश्नावर देशव्यापी आंदोलन छेडणार्या राजू शेट्टींचं बळ राष्ट्रीय पातळीवर वाढल्याचे हे यावरुन दिसून येते.

Loading...

अशोक गेहलोत यांचा अल्बर्ट हॉल परिसरात दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सचिन पायलट यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह दिग्गज नेते सोहळ्यास उपस्थित होते. विशेष विमानाने दिल्लीवरुन दाखल झालेल्या नेत्यांनी एकाच बसमधून सोहळ्याच्या ठिकाणापर्यंत प्रवास केला.

खासदार शेट्टींना हायकमांडचा कॉल

शपथविधी सोहळ्यासाठी खासदार शेट्टींना कॉग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी फोनवरुन निमंत्रण दिले होते. विशेष प्रोटॉकॉल देऊन शेट्टींना दुसऱ्या रांगेत स्थान होते. कनिमोळी या  शेट्टींच्या उजव्या हाताला बसल्या होत्या.

शेट्टींच्या आंदोलनांमुळे कॉग्रेसला ‘बळ’

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रीय आंदोलन उभारण्यात शेट्टींचा मोठा वाटा होता. सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यात त्यामुळे कॉग्रेसला यश मिळाले. त्याचा फायदा राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या निवडणुकीत पक्षाला मिळाला. गुजरातप्रमाणे राजस्थान आणि मध्यप्रदेशातील ग्रामीण मतदारांनी भाजपला टाळलं आणि कॉग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान केलं. त्यामुळे कॉग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

युपीए की तिसरी आघाडी, शेट्टी कुणाच्या गळाला ?

राष्ट्रीय स्तरावरील शेतकऱ्यांचा नेता अशी खासदार शेट्टींची प्रतिमा निर्माण झाली आहे. दोनशेहून अधिक शेतकरी संघटनां एका व्यासपीठावर आणण्याची किमया शेट्टींनी साधली होती. आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांचा प्रभाव लक्षात घेता राजू शेट्टींचे महत्व वाढणार आहे. एनडीएला सोडचिट्ठी दिल्यानंतर भाजपविरोधी नेत्यांमध्ये शेट्टींची उठबस वाढली आहे. त्यामुळे शेट्टी युपीए सोबत जाणार की कॉग्रेससोबत ‘हात’चं अंतर राखून तिसऱ्या आघाडीत सामील होणार याच उत्तर अद्यापही अनुत्तरितच आहे.Loading…


Loading…

Loading...