मराठा आदोलकांनी राजू शेट्टींना पळवून लावले

raju shetti

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घ्यायला गेलेल्या राजू शेट्टींना संतप्त आंदोलकांनी पळवून लावले. शेट्टी बाहुबलीचं दर्शन घ्यायला जातं असतांना त्यांनी हातकणंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. मात्र आदोलकांनी त्यांना भेटण्यास नकार दिला.

बाहुबलीला जाता जाता मराठा मोर्चाला भेट देण्याचे नाटक कशाला करता? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना यावेळी केला.

खासदार राजू शेट्टी हे बाहुबली येथे दर्शनासाठी जात असतानाच जाता जाता त्यांनी हातकणंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. खासदार शेट्टी हे आंदोलन स्थळी पोहोचताच मराठा समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. जाताजाता मराठा मोर्चा आंदोलन स्थळाकडे आल्याबद्दल कार्यकर्ते संतप्त झाले. व तुमची फुकटची सहानभूती आम्हाला नको. तुम्ही परत जा म्हणतं त्यांनी राजू शेट्टींना आंदोलन स्थळापासून पिटाळून लावले.

ऊसदराचे श्रेय शेट्टींनी लाटू नये – हसन मुश्रीफ

शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने लुटणाऱ्यांना सोडणार नाही: राजू शेट्टी