fbpx

‘राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा’

टीम महाराष्ट्र देशा- राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे, तर मांडीवर जाऊन बसला आहे, असा जोरदार हल्लाबोल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपुरात विराट सभा झाली. यावेळी बोलताना खोत यांनी राजू शेट्टी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार आसुड ओढले.

खोत म्हणाले, या कोल्ह्याचा बंदोबस्त या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. म्हणून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे आवाहन खोत यांनी यावेळी केले.

दरम्यान, राजू शेट्टीवर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, राजू शेट्टींना मागील वेळेस त्यांना पाठिंबा दिला होता ही माझी चूक होती. चुकीच्या माणसासाठी हातकणंगलेची जागा सोडली होती. आता ती माझी चूक तुम्ही जनतेने सुधारायची आहे, असे ठाकरे म्हणाले.