राजू शेट्टींनी सत्कार करून मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

टीम महाराष्ट्र देशा : राजगुरुनगर-खेड येथील चार गावांशी निगडीत सेझ रद्द केल्याबदल खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई येथे सत्कार करून आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजू शेट्टी यांचे संबध ताणले असताना ही भेट विशेष मानली जात आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला कायमच धारेवर धरत सत्तेतील आपला सहभाग काढून घेतला आहे. त्यांनतर राजू शेट्टी यांचे खंदे साथीदार आणि मित्र सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद देऊन संघटना फोडण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची कुणकुण सुद्धा शेट्टी यांच्या मनात कायम सलत आहे. मात्र अस असल तरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडल्यामुळे राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत .