गोपीनाथ मुंडेंच्या चेहऱ्याला भुललो – राजू शेट्टी

raju shetti

मुंबई : भाजपच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. भाजपने सत्तेत येताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी आश्वासनाची खैरात केली. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची निराशा केली. आपण गोपीनाथ मुंडेंच्या चेहऱ्याला भुलून भाजपला पाठींबा दिला होता. मात्र या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने, आपण सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हंटले.

राज्यातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसह संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकजूट करत ‘मित्र लोकशाहीचे’ हा फोरम स्थापित केला आहे. या फोरमने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या ‘संवादातून सहमतीकडे २०१९’ या परिसंवादात राजू शेट्टी बोलत होते.

शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, आमचे प्रश्न तडीस जाणार नसतील तर हे कुणासाठी करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, एकट्याने चळवळी घेऊन आम्ही लढत आहोत. एक शेतकरी चळवळ सोडली, तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत. राज्यातल्या सहकार बुडाला असून बँकांची अवस्था बिकट आहे. गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र वास्तविक परिस्थिती समजताच सगळ्यात आधी आम्हीच तिथून बाहेर पडल्याचंही ते म्हणाले.Loading…
Loading...