fbpx

सरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदीसाठी सरकारने प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली नाही. आपली बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली असती तर कोर्टाने देखील डान्सबार वरील बंदी उठवण्याचा निर्णय दिला नसता म्हणत खा. राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली आहे. तसेच सरकारमधील काही लोकांनाच डान्सबार मधील पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने डान्सबार बंदी उठवण्याच्या निर्णय दिला आहे. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच सरकारने योग्य बाजू मांडली नसल्याच्या आरोप देखील करण्यात येत आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी देखील भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.

न्यायालयाच्या संमतीनेच यापूर्वी डान्सबारवर बंदी घालण्यात आली होती, आजही कायदे आणि न्यायालये तीच आहेत. मात्र आता डान्सबारवरील बंदी न्यायालय उठवते याचा अर्थ सरकारने आपली बाजू प्रभावीपणे मांडली नाही. असाच होत असल्याच शेट्टी म्हणाले.