भाजपच्या भाड्यांंनी महाराष्ट्राची अस्मिता भाड्याने दिली, राजू शेट्टी सरकारवर संतापले

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते.

भाजपच्या भाड्यानी महाराष्ट्राची अस्मिता भाड्याने दिली. शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्य करायचं आणि त्याच शिवरायांचे गड किल्ले भाड्याने देताना लाज कशी वाटली नाही. पैसाच पाहिजे होता तर कटोरा घेऊन भीक मागत फिरला असता तर राज्यातील जनतेनेच तुमचा कटोरा भरला असता. असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाला गडप्रेमी आणि विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. हा तुघलकी निर्णय आहे हा मराठी मातीचा अस्मितेचा अपमान आहे . गडकील्ले हे कुणाच्या बापाची जहागिर नाही. असा घणाघात आव्हाड यांनी केला आहे.

राजस्थान आणि गोव्यामध्ये तेथील राज्य सरकारकडून किल्यांवर हॉटेल्स आणि रिसॉर्ट निर्माण करण्यात आलेले आहेत, त्यामुळे या राज्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळाली आहे. आपल्याकडे देखील हेरिटेज पर्यटनासाठी वाव असल्याचं एमटीडीसीकडून सांगण्यात आल आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार हे किल्ले ६० ते ९० वर्षांसाठी करारावर दिले जाऊ शकतात.

सरकारच्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे. असं मत सुळे यांनी व्यक्त केले आहे.

औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. सरकारने शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान केलं अशा २५ किल्ल्यांचे हॉटेल व डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक व निषेधार्ह आहे. आम्ही कदापि हे होऊ देणार नाही, असा इशारा देखील कोल्हे यांनी दिला आहे.

मनसे नेते अनिल शिदोरे यांनी देखील सरकारच्या निर्णयावर संताp व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातले २५ गढ-किल्ले आता हॉटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला आणि संताप अनावर झाला.. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहास हा आमचा फार मोठा ठेवा आहे, त्याचा बाजार करू नका. अशी टीका शिदोरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या