fbpx

चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्यांमुळेच मराठा आंदोलन चिरघळले – शेट्टी

पुणे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्यांमुळे मराठा आंदोलन चिरघळल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. ते फेसबुक लाईव्हमध्ये बोलतं होते. तसेच पाटील यांची जीभ अलीकडच्या काळात वारंवार घसरू लागली असून, त्यांना सत्तेचा माज चढला असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला.

आपण मुख्यमंत्री आहोत अशा थाटात सर्वच विषयावर सध्या पाटील मत व्यक्त करीत असतात. मात्र त्यांची आकलनक्षमता कमी आहे. त्यामुळे त्यांना प्रश्नच समजत नाहीत. त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे मराठा आंदोलन चिघळले आहे. ते मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरत असतात, अशी टीका त्यांनी केली.मराठा आरक्षणापासून दूध आंदोलनापर्यंत सर्वच विषयावर राज्य सरकार व मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना करीत नाहीत. मुळात अशाप्रकारच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची सुरवातीपासून भूमिका राहिली आहे. मात्र अंगलट येऊ लागल्यानंतर त्यांना जागा येते असंही शेट्टी यावेळी म्हणाले.

मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वानीच दिले. मात्र दिलेल्या आश्वासनांवर ठाम न राहता लोकांची फसवणूक केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याचा अनुभव सध्या मुख्यमंत्री घेत असल्याची टीका त्यांनी केली.

मराठा आरक्षण : सांगलीत बस पेटवली, नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद

मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न – अशोक चव्हाण

2 Comments

Click here to post a comment