‘मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

भाजपच्या या महाजनादेश यात्रेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी मराठवाड्यासह राज्यात मोठा दुष्काळ आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. अशावेळी त्यांना दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. अशा प्रकारची यात्रा काढून ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना शेट्टी यांनी विधानसभा निवाद्नुकीचिषयी बोलताना ‘चंद्रकांत पाटील यांना स्वतःचा मतदारसंघ नाही. ते मतदारसंघाची चाचपणी करत आहेत. ते ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याच शेट्टी यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, राजू शेट्टी हे २०१४ ला भाजपसोबत होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी ते आघाडीसोबत गेले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला आहे.