शेतकऱ्यांनो आता तरी गावठी निरव मोदी व्हा ; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : दूध संघांनी गायी, म्हशी घ्यायला अनुदान दिले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून संकलनाची सक्ती होईल. अॅॅडव्हान्स दिला म्हणून सांगून ते हे काम करतील. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करा, त्यातूनही जबरदस्ती झालीच तर अडव्हान्स बुडला म्हणून सांगा काय होतय ते होऊ दे, त्या दिवसापुरते तरी गावठी निरव मोदी व्हा, असा सल्लाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राहू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे.

तर काढलेले दूध करायचे काय, हा तुमच्यासमोर प्रश्न असेल. एक थेंबही दूध संघाला जाणार नाही याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्या, त्यातूनही दुधाचे काय करायचे, असा प्रश्न पडला असेल तर पंढरीची वारी सुरू झाली आहे, त्या वारीकडे हे दूध पाठवा. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १६ जुलैला पंढरीच्या विठुरायाला आम्ही दुधाचा अभिषेक घालणारच आहोत, वारकरीही यानिमित्ताने या दुधाचा लाभ घेतील, असे शेट्टी म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी दुग्ध विकास मंत्री प्रा. महादेव जानकर यांनाही हे दूध पाठवा, अशी आरोळी दिली.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...