राजू शेट्टींनी ज्या गोविंद बागेत पवारांविरोधात जंग छेडली आज तिथचं आमदारकी स्वीकारली ?

raju shetti

पुणे : राजकारणामध्ये काहीही घडू शकते, हे महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना पहिलच होत पण आज पुन्हा याचा प्रत्येय आला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातील वाद राज्याला माहितच आहे. पण, आता खुद्द राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची बारामतीत गोविंद बागेत जाऊन भेट घेतली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार बाळाराम पाटील, आमदार दत्तात्रय सावंत, प्रमोदकाका काकडे आदी उपस्थित होते.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी राजू शेट्टी यांच नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःच्या कोट्यातून शेट्टी यांनी उमेदवारी देऊ केली आहे. मात्र राजू शेट्टी यांनी आपल्या राजीकीय आयुष्यात ज्या गोविंद बागेच्या बाहेर पवारांच्या विरोधात अनेक आंदोलन केले तिथच आज राजू शेट्टी यांनी आमदारकी स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान, शेट्टी यांनी ऊसदराच्या मुद्द्यावरून सहा वर्षांपूर्वी गोविंद बागेत जाऊन आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची खूप चर्चा देखील झाली होती. त्याच गोविंद बागेत आज त्यांनी पवारांचा आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारलाने राजकरणात काहीही होऊ शकत हे मात्र नक्की. शेट्टी सुमारे तीन तास बारामतीत होते.

महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ लोकप्रिय माजी खासदाराचे झाले कोरोनामुळे निधन

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीवेळी स्वाभिमानीला राष्ट्रवादीने एक विधानपरिषदेची जागा देण्याचे ठरले होते. तो शब्द पाळण्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मान्य केले. राज्यपालाच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीस शिफारस करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शब्द पाळला. त्यांचे मनापासून धन्यवाद. अशा भावना राजू शेट्टी यांनी या भेटनंतर व्यक्त केल्या आहेत.

शेट्टी सुमारे तीन तास बारामतीत होते. यादरम्यान, स्वत:च्या कारमधून पवार यांनी त्यांना कृषीसमृद्ध बारामतीचं दर्शन घडवलं. शेट्टी यांच्यासह पवारांनी बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना भेट दिली. देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी गिर,साहिवाल,खिलार, पंढरपुरी, मुर्रा म्हैस या देशी जनावरांसंबंधी संशोधनकार्य इथे होतं. ट्रस्टने राष्ट्रीय कृषी योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेल्या डेअरी प्रकल्पामार्फत दुधाची, रक्ताची तपासणी, चाऱ्याची तपासणी तसंच पशुपालनाचं प्रशिक्षण दिलं जातं. शेण, गोमूत्र आणि दुधावर मूल्य संवर्धन प्रक्रिया केंद्रही येथे उभारलं जात आहे. नेदरलँडच्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रातही पवार शेट्टींना घेऊन गेले.

सरकार ताठीवर जायला आता तीन चार महिने पुरे आहेत, खा. नाईक निंबाळकरांचा सूचक इशारा