Raju Patil । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा-शिंदे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या दीपोत्सव मेळाव्यातही हे तीनही नेते एकत्र दिसले होते. त्यामुळे या सर्व भेटीगाठी म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत तर नाहीत ना? अशा चर्चा सुरु आहेत. अशातच मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
आमची सर्वांची मन जुळलेली आहेत फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल असे विधान आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यांतील जवळीक वाढत आहे. यामुळे नवी युती पाहायाला मिळेल अशी चर्चा रंगली होती. राजू पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मनसे युतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसत आहे.
पुढे ते म्हणाले, राजकारणात विरोधक असलो तरी आम्ही दुश्मन नाही. वैयक्तिक असं काही नसतं एकमेकाला चांगले शुभेच्छा नेहमी देत असतो. दिसताना चित्र वेगळं दिसतं परंतु सगळं गोष्टी तशा नसतात राजकारण तसं नसतं तर युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. असंही राजू पाटील म्हणालेत.
प्रत्येक वेळेस राजकारण करण्याची आवश्यकता नसते. काही गोष्टी आमच्या जुळून येत असतील, त्याने जवळीक वाढत असेल तर त्यातून कुणी वेगळे अर्थ काढायची आवश्यकता नाही. जर माझी चार काम खासदार शिंदे यांच्यामुळे होत असतील, त्यांनी मला कार्यालयात बोलावंल तर मी जाईल. लोकांसाठी किंवा सणासुदीला एकत्र येण्यास काही हरकत नाही यातून एवढाच अर्थ काढावा असं राजू पाटील यांनी म्हंटल आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत युती करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “..तर सरकारच्या खुर्चीखाली धमाका”; ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
- Honda Activa | Zero डाऊन पेमेंट सह उपलब्ध आहेत होंडा ॲक्टिवा
- Eknath Shinde | “24 मिनिटात त्यांनी काय पाहणी केली?”, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- Electric Scooter | High रेंज सह बाजारात उपलब्ध आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर
- Deepak Kesarkar | “दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार…”; दीपक केसरकरांचा ठाकरेंना टोला