प्रश्न राज ठाकरेंचे तर उत्तर शरद पवारांची; पुण्यात रंगणार ऐतिहासिक मुलाखत 

पुणे: महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या राजकारणात, समाजकारणात त्याचबरोबर विविध शेत्रात आपला एक वेगळा ठसा उमठ्वणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रोखठोक मुलाखत येत्या ३ जानेवारीला पुण्यात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. अजून विशेष म्हणजे या मुलाखतीच्या प्रश्नांची कोणतीच पूर्वकल्पना शरद पवार यांना दिली जाणार नसल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे ही मुलाखत मैचफिक्सिंग नसेल हे मात्र नक्की आहे.

विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या विशेष मुलाखतीचे आयोजन केले आहे. शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाला ५० वर्ष पूर्ण झाली त्याचबरोबर त्यांच्या अमृतम्होत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीचे आयोजन येत्या ३ जानेवारीला पुण्यातील बीएमसीसीच्या प्रांगणात करण्यात आल आहे. गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्या प्रखर मुलाखतीसाठी कोण रोखठोक आहे याची चाचपणी सुरु होती. मात्र रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांच नाव सुचवलं आणि नंतर शरद पवार व राज ठाकरे यांची सहमती झाल्यानंतर ३ जानेवारी ही तारीख फिक्स करण्यात आले आहे. ही मुलाखत घडवून आणण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांची देखील पुढाकार घेतला आहे.

विशेष म्हणजे या मुलाखतींच्या प्रश्नांची कोणतीच पूर्व कल्पना राज ठाकरे हे शरद पवार यांना देणार नाहीत. त्यामुळे मुलाखत रोख ठोक आणि थेट असेल हे मात्र नक्की आहे. त्यामुळे राजकारणातील हिरो अर्थात शरद पवार हे राज ठाकरे यांच्या प्रश्नाला कश्या पदधतीने उत्तर देतील याकडे मात्र सर्व राजकीय वर्तुळाच लक्ष लागलेलं आहे.