सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा- राजस्थानातील सिनेमागृहाबाहेर ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचे पोस्टर्स जाळण्यात आले, त्याचप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली. अशोक पवार नामक युवकाच्या तक्रारीनंतर पोलिसात भादंवि कलम 153 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी वाल्मिकी समाजाने केली होती. अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन ही करण्यात आले होते.

एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

सलमान खानने त्याचं नृत्यकौशल्य सांगताना जातिवाचक शब्दाचा वापर केला होता तर शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते, हे सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.