राजस्थान मधील धक्कादायक प्रकार, मतदान यंत्र सापडले रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : मतदान यंत्रांच्या विश्वासहर्तेबद्दल विविध राजकीय पक्षांच्या मनात संशय असताना, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर मतदान यंत्र पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अक्षम्य दुर्लक्षासाठी दोन निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Rohan Deshmukh

राजस्थानच्या बारन जिल्ह्यात किशनगंज विधानसभा मतदारसंघातील शाहाबाद भागात एक मतदान यंत्र रस्त्यावर पडलेले होते. या प्रकरणी रात्री उशिरा आदेश काढून अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सापडलेल्या मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर झाला होता की नाही ? ते अजून स्पष्ट झालेले नाही.

राजस्थानमध्ये शुक्रवारी विधानसभेच्या २०० पैकी १९९ जागांसाठी मतदान झाले. ७२.७ टक्के मतदान झाले असून एकूण २,२७४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी ५२ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदानासाठी २ लाख मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात आला. मतदान यंत्राबद्दल विचारले असता, राखीव असलेले मतदान यंत्र ट्रकमधून रस्त्यावर पडले असावे असा अंदाज जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी व्यक्त केला

Latur Advt
You might also like
Comments
Loading...