‘पद्मावती’ सिनेमाला विरोध वाढला

padmavati...

मुंबई –  1 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध आणखी तीव्र झाला आहे. या चित्रपटाविरोधात आज, रविवारी मुंबई येथे अखंड राजपूत सेवा संघ, तर गुजरातमधील सूरतमध्ये राजपूत संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि करणी सेनेने संजय लीला भन्साळींच्या मुंबईतील जुहू इथल्या घरासमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

Loading...

अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला पद्मावती हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या व्यक्तीचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे आणि राणी पद्मावती यांचे चरित्र रंगवताना ऐतिहासिक संदर्भामध्ये फेरफार तर झाली नाही ना हे शोधून काढण्यासाठी ज्येष्ठ इतिहासकारांची एक समिती गठित करण्याची सूचना द्यावी, या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असून त्यात दुरुस्ती होईपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. पण संघटनांनी आपला विरोध कायम ठेवला आहे.

आज आंदोलकांनी पद्मावती सिनेमा थांबवण्याची मागणी केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. पद्मावती सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात आक्षेपार्ह चित्रण दाखवलं, राणी पद्मावतीचं चुकीचं चित्रण चित्रपटात केलं गेलं असा आंदोलकांचा आरोप आहे.Loading…


Loading…

Loading...