ठाण्यात भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला राजपूत आणि हिंदू संघटनांचा विरोध

ठाणे : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला ठाण्यात निषेध करण्यात आला आहे. राजपूत समाज व हिंदू संघटनांकडून या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटातून भन्साळी चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा आरोप राजपूत समाज व हिंदू संघटनेने केला आहे.

चित्रपटाविरोधात राजपूत आणि हिंदू संघटनांनी घोषणाबाजी देखील केल्या आहेत. चित्रपटातील पद्मावतीच्या संवादावर संघटनांनी आक्षेप घेतला आहे. १ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना चित्रपटाला विरोध वाढतोय. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच भन्साळी यांच्या मुंबईतील जुहू इथल्या कार्यालयाबाहेर पोलीस सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...