‘तारक मेहता…’मालिकेतील राजपाल यादव यांना जेठालालच्या भूमिकेची दिली होती ऑफर

राजपाल यादव

मुंबई : सोनी सबवरील गेली अनेक वर्ष सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. खास करून या मालिकेतील जेठालाल हे पात्र साकारत असलेले अभिनेते दिलीप जोशी प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.

मात्र शोमधील जेठालालच्या भूमिकेसाठी लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादवला विचारणा करण्यात आली होती. मात्र राजपालने जेठालाल गडा या भूमिकेसाठी नकार दिला असल्याचा खुलासा राजपाल यादवने केला आहे. यावर एका मुलाखतीत रेडीओ होस्ट सिद्धार्थ खन्नाने हे पात्र न केल्याची खंत वाटते का? असे विचारले.

यावर राजपाल यादव म्हणाला, ‘नाही, जेठालाल हे पात्र एका चांगल्या कलाकाराला देण्यात आलं आहे. आम्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात आहोत. त्यामुळे मला कोणत्याही कलाकाराच्या भूमिकेत स्वत:ला पाहण्याची आवश्यकता भासत नाही. तसचं मला वाटतं माझ्यासाठी म्हणजेच राजपाल यादवसाठी तयार केलेल्या भूमिका मला मिळो. मात्र एखाद्या अभिनेत्याने मोठ्या कष्टाने लोकप्रिय ठरवलेली भूमिका साकारण्याची माझी इच्छा नाही,’ असं म्हणत राजपालने दिलीप जोशी याचं कौतुक केल आहे.

मागील १३ वर्षापेक्षांही जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रमुख पात्र असलेली दया बेन ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिशा वाकानीने या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे या शोचे चाहते निराश असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP