fbpx

वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीचा आगळावेगळा पराक्रम

Rajneesh-Gurbani1-lg

टीम महाराष्ट्र देशा- विदर्भाचा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावर केला .दिल्लीच्या संघाविरुद्ध बळींची हॅटट्रिक साधली आहे . रजनीश या विक्रमामुळे रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग तीन बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. रजनीशच्या या धमाकेदार कामगिरीमुळे (६/५९) दिल्लीच्या संघाला पहिल्या डावात २९५ धावांवर रोखण्यात विदर्भच्या संघाला यश मिळाले आहे.

रणजी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक साधणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी तामिळनाडूच्या के. बी. कल्याणसुंदरम यांनी १९७२-७३ मध्ये मुंबईविरोधात चेन्नईमध्ये बळींची हॅटट्रिक साधली होती.तब्बल ४५ वर्षांनंतर ही कामगिरी नोंदवली गेली आहे.कोलकाता येथे कर्नाटकविरोधात १६२ धावा देत १२ बळी घेणाऱ्या रजनीशने सलग तीन चेंडूत ३ फलंदाजांचा त्रिफळा उडला. यामध्ये विकास मिश्रा (७), नवदीप सैनी (०) आणि शोरे (०) यांचे बळी घेत त्याने आपली हॅटट्रिक पूर्ण केली.