रजनीकांतच्या पत्नीने घेतली राज ठाकरेंची भेट

blank

मुंबई : सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांच्या  पत्नी लता रजनीकांत ह्यांनी आज राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ह्यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज ह्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर उभयतांत चर्चा झाली.

दरम्यान चित्रपटात आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर रजनीकांत हे आता राजकारणात आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. त्यांनी तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षाची स्थापना देखील केली आहे. आता रजनीकांत यांच्या पत्नीने राज ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधान आले आहे.