fbpx

तमिळनाडूच्या राजकारण्यांचे ‘फिल्मी’ कनेक्शन

film-connection-of-tamilnadu-political-leader1

टीम महाराष्ट्र देशा: ‘कबाली’ रजनीकांत यांनी आज तमिळनाडूच्या राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला . रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. दरम्यान तमिळनाडूच्या राजकारणात एखाद्या सिनेकलाकाराने प्रवेश करण्याची हि पहिलीच घटना नाहीये. या आधी झालेले अनेक मुख्यमंत्री हे सिनेसृष्टीतून राजकारणात प्रवेश केलेले आहेत.

एम. करुणानिधी

m karunanidhi  उत्तम कवी, लेखक आणि पटकथाकार म्हणून ओळखले जाणारे एम. करुणानिधी हे तब्बल पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. डीएमकेचे संस्थापक सी. एन. अन्नादुरई यांच्या मृत्यूनंतर करुणानिधी यांनी यशस्वीपणे द्रमुकची धुरा सांभाळली आहे.

एम जी रामचंद्रन एम जी रामचंद्रनमरुदुर गोपालन रामचंद्रन अर्थात एम जी रामचंद्रन हे हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते होते. १९४० पासून तब्बल तीन दशके त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत आपला दबदबा ठेवला होता. वाढती लोकप्रियता पाहता त्यांनी द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षात प्रवेश केला. पुढे अण्णा द्रमुक हा स्वतचा पक्ष स्थापन करत तामिळनाडूची सत्ता मिळवली. १९७७ ते १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे.

कॅप्टन विजयकांत

कॅप्टन विजयकांत१०० च्यावर तमिळ चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम केले कॅप्टन विजयकांत यांनी पुढे देसिया द्रमुक पक्षाची स्थापना केली. 2011 ते 2016 दरम्यान त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काम सांभाळले आहे.

जे. जयललिता

Jayaram Jayalalithaतामिळनाडूच्या राजकारणात अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे. जयललिता यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. त्यातील बहुतांश चित्रपट हे एम जी रामचंद्रन यांच्यासोबत आहेत. अम्मांनी 1982 मध्ये एम जी रामचंद्रन यांच्या सोबत राजकारणात प्रवेस केला. पाच वेळा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे.

2 Comments

Click here to post a comment