रजनीकांतची नवी वेबसाईट लाँच!

चाहत्यांनी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा अशी मागणी रजनीकांतने केली

टीम महाराष्ट्र देशा : 31 डिसेंबरला  आपण राजकारणात येणार असल्याचा निर्णय रजनीकांतने जाहीर केला होता. रजनीकांतने राजकारणात यावं म्हणून बऱ्याच वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर रजनीकांतने हा निर्णय घेतलाच आणि 31 डिसेंबरला  आपण राजकारणात येणार असल्याचा सांगितले.

राजकारणात येण्याची घोषणा केल्यानंतर आता रजनीकांत राजकीय दृष्ट्या सक्रीय होण्यासाठी इंटरनेटच्या जगात पाऊल टाकलय. www.rajanimandiram.com ही नवीन वेबसाईट त्याने लाँच केली आहे.

बिघडलेलं राजकारण पाहता आता  राज्यात राजकीय बदलाची गरज असल्याचं वक्तव्य रजनीकांतने केलं होतं. याच बदलासाठी रजनीकांत राजकारणात येणार आहे.  हा बदल घडून यावा यासाठी रजनीकांतने ही वेबसाईट काढली आहे असे सांगण्यात आले आहे. तसंच चाहत्यांनी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन  करा अशी मागणी रजनीकांतने केली आहे. रजनीकांतच्या एन्ट्रीनंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

You might also like
Comments
Loading...