fbpx

राजनाथसिंह यांची आठवले स्टाईल कविता

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘चौकीदार’ भलताच प्रसिद्ध होताना दिसत आहे. विरोधक नरेंद्र मोदी यांना उद्देशून चौकीदार चोर है अशा घोषणा लावत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हा में भी चौकीदार असे म्हणत आपल्या नावा पुढे चौकीदार असे लावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चौकीदारचा ट्रेंड आला आहे. दरम्यान या ट्रेंड वरच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एक आठवले स्टाईल कविता केली आहे.

भारतीय जनता पक्षाने विजय संकल्प रॅली आयोजित केली होती. या रॅली दरम्यान राजनाथसिंह यांनी एक कविता सादर केली. यावेळी राजनाथसिंह म्हणाले की, , ‘चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, देश की समस्याओं का वह ही क्युअर है.’ रामदास आठवले स्टाईलने कविता सादर केल्यामुळे त्यांनी वाहवा मिळवली. शिवाय, नेटकरी मंडळीनी संबंधित कविता सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. यामुळे राजनाथसिंह चर्चेत आले आहेत.

दरम्यान भाजपने सोशल मीडियावर ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेन सुरू केले. मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांनी त्यांच्या नावासमोर चौकीदार शब्द जोडण्यास सुरुवात केली. तोच धागा पकडत राजनाथसिंह यांनी पंतप्रधान मोदींसाठी जोरदार बॅटिंग केली आहे.