रोहिंग्यांना परत पाठवणार : राजनाथ सिंह

टीम महाराष्ट्र देशा :  ‘बांग्लादेशातून रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात केले आहेत. त्याचबरोबर सर्व राज्यांना सल्ला देण्यात आला आहे की, आपापल्या राज्यात आधीच शिरलेल्या रोहिंग्यांवर लक्ष ठेवा, त्यांना एकाच ठिकाणी ठेवा अन्य ठिकाणी पसरू देऊ नका. तसेच त्यांना देशाबाहेर हकलण्याचे अधिकार राज्यांना आहेत’, असे निवेदन त्यांनी लोकसभेत दिले. रोहिंग्यांच्या प्रश्नावर लोकसभेत निवेदन देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. रोहिंग्यांना राज्यात पसरू देऊ नये, तसेच त्यांना देशाबाहेर हकलण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, याआधी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी देखील रोहिंग्या संदर्भात भूमिका मांडण्यात आली होती. ‘रोहिंग्या मुसलमान देशात अवैधपणे राहतायत त्यांना हिंदुस्थानात जास्त काळ राहू देणार नाही. त्यांनी देशात स्थायिक होण्याआधी त्यांना देशातून बाहेर काढण्यात येईल’, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.

भाजपाला मिळालेल्या यशानंतर शेअर बाजारात मोठी उसळी

अजितदादांमुळेच आम्ही सत्तेत – गिरीश महाजन