राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा

राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा

rajnath singh

नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) हे काही दिवसांपूर्वी लखनऊ दौऱ्यावर होते. त्यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी मोदींसोबतचे दोन फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या खांद्यावर हात ठेऊन फिरताना दिसत आहेत. तसेच त्या दोघांमध्ये एखाद्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या फोटो संदर्भात आता केंद्रीय संरक्षण मंत्री आणि लखनऊचे भाजपाचे खासदार राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी खुलासा केला आहे.

गुरुवारी(२५ नोव्हें.)सिंह यांनी आपल्या एका भाषणाचा छोटा व्हिडीओ ट्विट केला. या ट्विटमधील भाषणामध्ये सिंह म्हणाले आहेत की,’नुकताच ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं ज्यामध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या खांद्यावर हात टाकून काहीतरी सांगताना दिसले. पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगत आहेत याबद्दल तर्क लढवले जात होते. यावेळी पंतप्रधानांनी, ‘योगीजी, तुम्ही एखाद्या धडाकेबाज खेळाडू प्रमाणे फलंदाजी करत आहात आणि तुम्हाला तुमचा हा शानदार फॉर्म असाच सुरु ठेवला पाहिजे. यामुळे भाजपाला विजय मिळवण्यास फायदा होईल’, असे सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. विकासाच्या मार्गाने नवा देश घडवण्याच्या संकल्प आम्ही केला. अशा अर्थाची कॅप्शन योगी यांनी या फोटोला दिली होती. योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या पाठीवर हात ठेऊन चालल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या: