fbpx

कर्नाटक राजीनामा नाट्य : कर्नाटकातील नेते राहुल गांधींना फॉलो करतात : राजनाथ सिंह

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातले जेडीएस –कॉंग्रेसचे सरकार धोक्यात आले असून कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी १३ आमदारांनी, नंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यामागे भाजपचा हात असल्याची टीका होत आहे.

कर्नाटक विधानसभेचा मुद्दा आज लोकसभेत गाजला. याविषयी भाष्य करताना या मुद्द्यावरुन काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या टीकेला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कर्नाटकातील राजीनामा नाट्याशी आमचा संबंध नाही. अशाप्रकारे आम्ही कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना पळवलेले नाही. लोकशाहीची नैतिक बाळगण्यात आम्ही कटीबद्ध आहोत. याशिवाय राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची परंपरा सुरु केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

दरम्यान, चौधरी यांनी सरकार लोकशाहीचा अवमान करत आहे. कर्नाटकातील राजीनामा नाट्यात भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे. ३०३ खासदारांवर तुमचे पोट भरत नाही. तुमचे पोट आणि काश्मीरचा गेट बरोबर झाले आहे असे आरोप केले.