तुमच्यात ताकद नसेल तर आम्ही ठोकतो , राजनाथ सिंहांंनी पाकिस्तानला सुनावले

टीम महाराष्ट्र देशा : देशात पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान संबंधामध्ये कमालीचे तणाव निर्माण झाले असून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दहशतवादाला खत-पाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच चाहुबाजुकडून कोंडीत आणले आहे. तर आता भारताने दहशतवादाला सहन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानकडे ताकद नसेल तर त्यांनी आमच्याकडे मदत मागावी, आम्ही दहशतवाद नष्ट करु, असे आवाहन भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवाद संपवायचा असेल तर पाकिस्तानने भारताकडे मदत माघावी आम्ही ती मदत करायला तयार आहोत. पण दहशतवाद समूळ नष्ट झाला पाहिजे. दहशतवाद संपवण्यासाठी निर्णायक युद्ध व्हायला हवे.

दरम्यान भारताकडून करण्यात आलेले स्ट्राईक हे दहशतवादाविरोधात होते. त्यामुळे भारताचे पाकिस्तानी लष्कराशी युद्धनसून ते दहशतवाद्यांशी आहे हे भारताने वेळोवेळी पाकिस्तानला सांगितले आहे. पण पाकिस्तान मात्र आपले लष्कर मागे ठेवून दहशतवाद्यांच्या मदतीने भारताला सतत इजा पोहचवण्याचे काम करत आहे.