लष्करावर दगडफेक करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

श्रीनगर : सध्या गृहमंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये काश्मिरच्या खोऱ्यामध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.ते श्रीनगरमधील स्पोर्ट्स कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते.

राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले की, खेळ तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतील. मुलांना चुकीच्या वाटेवर नेणं सोपं असतं, आणि हे सत्य आम्हाला माहित असल्यामुळेच अल्पवयीन मुलांविरोधातील दगडफेकीसंदर्भात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आम्ही. घेतला आहे.

या प्रसंगी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती उपस्थित होत्या. “जम्मू व काश्मिरमधल्या मुलांनाही देशातल्या अन्य राज्यांप्रमाणे त्यांना विविध संधी आणि चांगले वातावरण मिळायला हवं. ते झालं तर दगडफेकीच्या घटना, बाँबस्फोट व गोळीबाराच्या घटना थांबतील व मुलांना विकासाची संधी मिळेल,” असं यावेळी मेहबुबा म्हणाल्या.