राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या होत्या…राजकारण… समाजकारण…धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी स्मृतींदिनानिमित्त अभिवादन करुन त्यांच्या कार्याला… विचारांना… स्मृतींना उजाळा दिला.

जात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणाची कामे केली. परराज्यांशीही सहकार्याचे, सलोख्याचे संबंध राखले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी दाखवलेल्या मार्गानं राज्यकारभार करणे, जनतेला सुखी ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अहिल्यादेवींनी त्यांच्या कारकिर्दीत देवळांचा, तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. मशिदी, दर्ग्यांसाठीही मदत केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत, जगन्नाथपुरीपासून सोमनाथापर्यंत अखंड भारतात लोकविकासाची कामे केली. त्यांनी उभारलेली मंदिरं, उद्यानं, अन्नछत्र, विहीरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत असेही अजित पवार म्हणाले.

नर्मदा, गंगा, गोदावरी नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. लोकांना सोबत घेऊन पडीक जमीनींचा विकास केला. करपद्धतीत, न्यायव्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाचा प्रसार केला. लोककलांना प्रोत्साहन दिले. जीवनाच्या अखेरपर्यंत लोककल्याणाचा ध्यास घेऊन कामे केली. त्यांचे कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

भाजपाच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाचा विळखा

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला