fbpx

राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर होण्याचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि पोलीस यावरुन आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा सामना सुरु आहे. पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर बंगालमधील वातावरण ढवळून निघत असताना सीबीआयसमोर हजर होऊन तपासात सहकार्य करा असे आदेश कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान,आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना रविवारी कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्य सरकारच्या परवानगीविना सीबीआयने थेट पोलीस आयुक्तांवर छापा टाकल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आणि त्यांनी थेट मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरु करत थयथयाट केला होता.

सीबीआयसमोर हजर होऊन तपासात सहकार्य करा असे जरी राजीव कुमार यांना सांगण्यात आलं असलं तरीही त्यांना अटक करू नका असं सांगत कोर्टाने अटकेपासून सरंक्षण दिलं आहे.