मागासवर्गीयांना न्याय मिळू नये यासाठी राजीव गांधींचे प्रयत्न : मोदी

निवडणुकीलाच कॉंग्रेसला दलितांची आठवण येते

महाराष्ट्र देशा : राजीव गांधी यांनी मंडल आयोगाविरोधात भूमिका घेतली होती, याची नोंद संसदेच्या कामकाजात आहे. यावरूनच मागासवर्गीयांना न्याय मिळू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षण सुरु राहण गरजेच आहे, त्यामुळे आरक्षण कधीही बंद होणार नाही. आरक्षणाद्वारे दलित समाजाला सक्षम करण्याची प्रक्रिया सुरु राहील, असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितल आहे.

तर निवडणुका जवळ आल्यावरच कॉंग्रेसला दलितांची आठवणे येते. त्यामुळे त्यांच्याकडून समाजात गैरसमज पसरवले जात असल्याच म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेस आधीपासून दलित आणि मागासवर्गीय समाजाविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

You might also like
Comments
Loading...