‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’,भाजप प्रवक्त्याची पोस्टरबाजी

टीम महाराष्ट्र देशा- शीख विरोधी दंगलीत काँग्रेसचा सक्रीय सहभाग होता असा आरोप केला जातो. मात्र दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केल्यानंतर नवा वाद सुरु झाला आहे.

दिल्लीत अनेक महत्वाच्या ठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ असा आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. फलकांवर प्रकाशक तेजिंदरपालसिंग बग्गा असे नाव आहे. या होर्डिंग्जमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक

You might also like
Comments
Loading...