‘एक लाजरा अन साजरा..’गाण्यावरील राजेश्वरीचा व्हिडिओ झाला व्हायरल

rajaewari

मुंबई : ‘फँड्री’ चित्रपटातून राजेश्वरी खरात हीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने जास्त चित्रपटात काम केले नसले तरी बरीच प्रसिध्द झाली. ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया हे प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचे मोठे व्यासपीठ बनले असून याचा फायदा राजेश्वरीला चांगलाच झालेला दिसत आहे. राजेश्वरीने नुकतेच एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या गाण्यांवर हावभाव करताना दिसत आहे. जसे गाणे बदलेल, तसे तिचे कपडे आणि मेकअप देखील वेगळा दिसत आहे. या व्हिडिओची सुरुवात ‘एक लाजरा अन साजरा मुखडा’ या गाण्यापासून होते. यानंतर काही गाणी आहेत. एका गाण्यात तर राजेश्वरीला मिशा आलेल्या दिसत आहेत.

तिने ‘जीव माझा’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. नुकतेच तिने तिच्या आगामी ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चाहते तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या