टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती करणार-राजेश टोपे

टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती करणार-राजेश टोपे

rajesh tope

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले होते.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही या परीक्षांबाबतचा घोळ सुटता सुटत नाहीये. आता गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.

३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आता राज्यभर घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आता पुन्हा ही आरोग्य भरतीची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्य शासनाचा सावळा गोंधळ कशा प्रकारे सुरु आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. दर्म्य्ना याबाबत आता आरोग्यमंत्री टोपे यांनी भास्य केले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची असल्यानं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती करणार आहोत असे ते म्हणाले आहेत.

यावर बोलताना टोपे म्हणाले कि, ‘मी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना विनंती केली आहे आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा अशी विनंती केली आहे. मी याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल, विद्यार्थीचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.’ असे स्पष्ट मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या