राजेश टोपे आक्रमक, रात्री 2 वाजता हॉस्पिटलवर धाड टाकून केली थेट कारवाई

Rajesh-Tope-1

मुंबई : राज्यातील कोरोना आपले हातपाय पसरत असताना सरकार प्रयत्नाची पराकष्ठा करून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी झटत आहे. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांना काही मोठे हॉस्पिटल केराची टोपली दाखवत आहेत आशा अनेक तक्रारी येत आहेत. अशात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अशा हॉस्पिटल विरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत.

कोरोना उपचारासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने मुंबईतील लिलावती, जसलोक, बॉम्बे व हिंदुजा या चार खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आहे. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये, ३२२ रेशन दुकानांचे परवाने केले रद्द

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. करोनाबरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे डॉ. सुधाकर शिंदे हेही त्यांच्या सोबत होते. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.

सुरुवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण खाटा, ८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला. या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची पूर्तता होत नसल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे..

…तर अक्षय बोऱ्हाडेला उलटा टांगून मारणार; 3 एकर जमीन, दुकान, वडिलांच्या नोकरीमध्ये सेटलमेंट केल्याचा आरोप