पुणे: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरत आहे. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी तसेच लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई व पुण्यातील आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
पुण्यात आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार नंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास ८० लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’; अजित पवारांचं आवाहन
- पुणेकरांनो कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा…
- वहिनी कतरिना सनी कौशलचा फोटो पाहून झाली फिदा, कमेंट करत म्हणाली…
- मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा देखील बंद
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<