मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर राज्य त्यांचा आदेश पाळणार – राजेश टोपे

rajesh tope

जालना : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

विषाणू आताप्रमाणेच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात लवकरच तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार लॉकडाऊन लावण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता देशांत लॉकडाऊन लावावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. देशात लॉकडाऊन लावायचा की नाही ? हा केंद्राचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतल्यास त्यांचा निंर्णय सर्व राज्यांना पाळावाच लागतो. त्यामुळे राज्य देखील केंद्राचा आदेश पाळणार असून पंतप्रधान योग्य निंर्णय घेतील असं टोपे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या