पुणे: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना (Corona) तसेच ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याची लागण होऊ नये म्हणून शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्याची राजधानी मुंबई तसेच पुणे व इतर काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढ होत होती. मात्र आता या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या ४७ हजारावर पोहोचली होती. तो आकडा २५ हजारापर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी घट झाली आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, राज्यात तिसऱ्या लाटेसाठी (Corona Third Wave) तयार करण्यात आलेले ९० ते ९२ टक्के बेडस रिकामे आहेत. अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन या सुविधांची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी एक टक्का इतकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे, असे म्हणता येईल. तसेच राज्यात करोनाच्या बीए-२ (BA-2) नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
“जनाब संजय राऊत झिंग झिंग झिंगाट झाले आहेत”, गोपीचंद पडळकरांची टीका
खा. सुप्रिया सुळेंचे श्री संत तुकाराम महाराजांना साकडे, संस्थान अध्यक्षांशी केली चर्चा
राज्यात निर्बंध शिथील बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती
अनिल देशमुखांची पाठराखण करणारे शरद पवार आता काय बोलणार?- केशव उपाध्ये