महिलेला अपशब्द बोलणाऱ्या राजेंद्र राऊतांवर गुन्हा दाखल, संतप्त महिलांचा बार्शीत आज मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना बार्शी मतदारसंघातील वातावरण पेटले आहे. याला कारण आहे ते अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी महिलेबद्दल बोललेले अपशब्द. भाजपचे नेते आणि महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली होती. यावेळी राऊत यांनी मिरगणे यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या मिरगणे यांच्या राजेंद्र राऊत यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. तर आज तालुक्यातील सर्वधर्मीय महिला राऊत यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत.

वैराग पोलीस ठाण्यामध्ये राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वी कलम २९४, ५०९, ५००, ५०६, १८८ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना राजेंद्र मिरगणे म्हणाले कि, हा प्रश्न केवळ माझ्या पत्नीबद्दल काढलेल्या अनुद्गारांचा नाही तर सर्व जातीधर्मातील महिलांची अस्मिता स्वाभीमान आणि प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचविणारा आहे. एका बेकायदेशीर व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या अशिक्षित राजकीय कार्यकर्त्यांने जनतेची दिशाभूल केली. आणि राजकीय पदे मिळवली. आता हा समाजकंटक केवळ निवडणूकीतील वातावरणामध्ये स्वत:च्या पायाखालची वाळू घसरली म्हणून केवळ माझी बदनामी आणि चारित्रहनन करण्यासाठी बेताल आणि घाणेरडी वक्तव्य करत आहे.

पुढे मिरगणे म्हणाले, माझ्या उच्च विद्याविभूषित आणि सामाजिक व राजकीय वाटचालीत कसलेही उनीव व डाग शोधता येत नसल्यामुळे माझ्या विरोधात खालच्या पातळीवर जावुन बोलत आहे. त्यामुळे कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाच्या आब्रुवर घाला घातल्यामुळे लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या मराठा समाजाला मी राऊतांच्या या वक्तव्यांकडे डोळसपणे आणि आर्ंतमुख होवुन पाहण्याचे आवाहन करत आहे. राऊतासारख्या मराठा समाजातील दुषप्रर्वत्तीला वेळीच आवर घालण्याची व हि प्रवृत्तीला ठेचण्याची गरज आहे त्यामुळे या मोर्चाला सकल मराठा समाज बंधू बघिनींनी उपस्थित रहावे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. स्त्रीचा सन्मान करणारा आहे हे दाखवून द्यावे. स्वत:ला छत्रपती म्हणून घेण्याची राऊताला लाज वाटली पाहिजे. त्याने सर्व स्त्रीयांचा अपमान केला आहे.

दरम्यान, आज सकाळी १० वाजता माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी महिलेबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेर्धात, त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बार्शी तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील तेलगिरणी चौकापासून सकाळी 10.00 वाजता मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती.पद्मजा काळे, प्रा.अश्विनी बुडूख, प्रतिभा मुळीक, मंगल पाटील, मनिषा नान्नजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महत्वाच्या बातम्या