औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ झाले उपमहापौर

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेने बाजी मारली आहे. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना 51 मतं पडली, तर भाजपचे गोकुळ मलके यांना 32 मते मिळाली.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौर पदाची जागा रिक्त होती. या पदासाठी आज (ता. 31) निवडणूक झाली. सुरवातीला महाविकास आघाडीत उपमहापौरपद काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली.

Loading...

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, काँग्रेसचे अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून जफर बिल्डर असे उमेदवार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजेंद्र जंजाळ यांना एकूण 51 मत दिली. तर भाजप पुरस्कृत मलके यांना 34, तर एमआयएमच्या जफर बिल्डर यांना 13 मतांवर समाधान मानावे लागले.

मात्र पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 6 नगरसेवकांची हकालपट्टी केली. एमआयएमच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत गैरहजेर राहून विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे नगरसेवकांना त्यांची गैरहजेरी चांगलीच भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी