राजेंद्र गावित यांची उमेदवारी धोक्यात, सचिन शिंगडा यांनी उमेदवारी अर्जावर घेतला आक्षेप

टीम महाराष्ट्र देशा : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालघर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवारांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे राजेंद्र गावित काहीसे अडचणीत आल्याच दिसत आहे.राजेंद्र गावित यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी आक्षेप घेतला असून, या आक्षेपानंतर छाननी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरताना मागील काही शासकीय निवासस्थानांची थकबाकी नसल्या बाबतचे प्रमाणपत्र आपल्या उमेदवारी अर्जाला जोडलेले नाही. याच बाबींवर बोट ठेवत अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी राजेंद्र गावित यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच निर्णय देणार आहेत.

दरम्यान पालघरमध्ये युतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित लढणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार सचिन शिंगाडा असणार आहेत. सचिन शिंगडा हे काँग्रेस चे माजी खासदार दामू शिंगडा यांचे पुत्र आहेत.