मी काँग्रेसचा कार्यकर्ता , काँग्रेस पक्षातच राहणार : राजेंद्र गावित

भाजपला आणखी एक धक्का

मुंबई: चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं मोठ्या पेचप्रसंगात सापडलेल्या भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. श्रीनिवास वनगा यांच्याविरोधात भाजपकडून काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी उमेदवारी देण्याची चाचपणी सुरु असताना गावित यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षातच राहणार असं म्हणत भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरभाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होता. गावित भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं.

You might also like
Comments
Loading...