राजेंद्र चोरगे यांना खंडणीसाठी धमकी

सातारा : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांना फोनवरुन सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याची धमकी देवून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात रणजीतसिंह किरणसिंह राजेशिर्के रा. जकातवाडी, सातारा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र मधुकर चोरगे यांच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालयात डिसेंबर 2016 रोजी सहकारी जगदिश शिंदे यांना भेटून आरोपी रणजीतसिंह किरणसिंह राजेशिर्के याने सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवेन,अशी धमकी देवून खंडणीची मागणी केली होती. याकडे लक्ष न दिल्याने दि. 26 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता डबेवाडी, ता. सातारा हद्दीत रणजीतसिंह राजेशिर्के याने चोरगे यांच्या मोबाईल फोनवर 9763717981 या क्रमांकावरुन धमकी दिली. यात तो म्हणाला, तुमचे जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठेतील व्यंकटेश अपार्टमेंट, ऐश्‍वर्या नगरी, डबेवाडी येथील सर्व बांधकामे ही अनधिकृत व बेकायदेशीर आहेत. याची माहिती मी माहितीच्या अधिकाराद्वारे मिळवली आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देईल तसेच प्रसारमाध्यमांमध्ये पसरवल्या जातील. हे प्रकरण मिटवायचे असेल तर 75 लाख रुपये द्यावे लागतील. नाही तर तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउनि मचले व पोहवा. सुजीत भोसले करत आहेत.Loading…
Loading...