मुंबई – दिल्लीदरम्यान नवी राजधानी एक्स्प्रेस धावणार !

मुंबई : मुंबई ते दिल्ली दरम्यान आणखी एक राजधानी एक्स्प्रेस धावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही नवी राजधानी एक्सप्रेस सर्वात जलद असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यान सध्या ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस आणि मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस अशा दोन राजधानी धावत आहेत. या नव्या राजधानी एक्स्प्रेसची काल दुसरी यशस्वी चाचणी करण्यात आली. या रेल्वेला एलएचीबी कोच लावण्यात आले असून मुंबई ते दिल्ली हे अंतर अवघ्या १३ तास ५० मिनिटांत पूर्ण होणार आहे. नव्या रेल्वेला दोन लोको इंजिन लावले जोडल्याने ही रेल्वे दुसऱ्या रेल्वेच्या तुलनेत तीन तास आधी पोहोचेल, असा दावा करण्यात आला आहे.

Comments
Loading...