आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचे हटके ट्विट

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतत आहे. या दरम्यान आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघातील महत्वाचा खेळाडू रियान परागने एक हटके ट्विट करत आयपीएल स्पर्धेचा निरोप घेतला आहे. रियान परागने काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या स्टाइलमध्ये ट्विट करत, ‘खतम, टाटा, बाय बाय’ असे ट्विट केले. रियान परागचे हे ट्विट भरपूर व्हायरल होत आहे.

कोरोना संसर्गाच्या सावटाखाली भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. ४ मे रोजी केकेआर, सीएसके तर ५ मे रोजी हैदराबाद आणि दिल्लीच्या संघातील खेळाडुंना कोरोनाची लागण झाली. यानंतर बीसीसीआयने तत्काळ बैठक बोलावली आणि स्पर्धा रद्द करण्यचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या