टिळक हे दहशतवादाचे जनक; आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त उल्लेख

जयपूर- राजस्थानमधील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी रेफरन्स पुस्तकामध्ये बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक असल्याचा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान आता यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे. ‘अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. ‘टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात. ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

राजस्थानमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते इंग्रजी रेफरन्स बुकमध्ये अनेक ठिकाणी शब्दांची निवड चुकली आहे. पण टिळकांविषयी अशा शब्दाचा वापर असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना दिले जावे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Shivjal