काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नाही, पायलटांच्या पाठीशी सिंधिया उभे

Sachin-Pilot-and-Scindia

नवी दिल्ली : कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक मोठे राज्य जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये शनिवारपासून मोठी उलथापालथ सुरु झाली असून उप मुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. नाराज असलेल्या पायलटांना त्यांचे काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेलेले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाठबळ मिळाले आहे. शिंदे यांनी पायलट यांचे उघडपणे समर्थन केले आहे. यामुळे राजस्थानमध्येही सत्तापालट अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्विट करत काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. ”माझे जुने साथीदार राहिलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून डावलले जात आहे. हे पाहून मी दु:खी आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नसल्याचे स्पष्ट होत आहे., असे ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस, सचिन पायलट आणि गेहलोत यांना टॅग केले आहे.

दिलासादायक : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर

दरम्यान, नुकतंच सचिन पायलट यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजस्थानमधील गेहलोत सरकार अस्थिर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सचिन पायलट यांनी नुकतंच ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. सचिन पायलट आणि शिंदे हे एकमेकांचे मित्र आहेत. विधीमंडळच्या बैठकी आधी शिंदे आणि पायलट यांच्या भेटीने गेहलोत सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धारावीचं श्रेय भाजपाने घेणं म्हणजे मढ्यावरच लोणी खाणं, शिवसेना नेत्याचं प्रत्युत्तर