अजून एका भाजप मंत्र्याची ‘स्वच्छ भारत अभियाना’वर लघुशंका !

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे ‘स्वच्छ भारत अभियान’ पण याच अभियानाचा भाजप मंत्र्यांना विसर पडल्याच दिसत आहे. एकीकडे कोट्यवधी खर्चून सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारच्या एका मंत्र्याला याचा पुरेपुर विसर पडलेला दिसत आहे, कारण पक्षानं राबवलेल्या या अभियानाचा विचार न करता हे मंत्री महोदय चक्क रस्त्यावर लघुशंका करताना दिसत आहेत. राजस्थानमधले भाजपाचे मंत्री कालीचरण सराफ यांचा भररस्त्यात लघुशंका करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

राजस्थानमध्ये रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारला जातो. तर आरोग्याच्या नावावर मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात मात्र, राजस्थान सरकार मधील आरोग्य मंत्री कालीचरण सराफ अस लज्जास्पद कृत्य करून समाजात चुकीचा संदेश देत आहेत. तेव्हा आता या मंत्री मोहदायांवर राजस्थान सरकार कारवाई करण्याच धाडस दाखवणार का ? हे पाहण्यासारख आहे.

Shivjal