कंडोमच्या जाहिराती फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच का दाखवाव्यात?-हायकोर्ट

condom

टीम महाराष्ट्र देशा- कंडोमच्या जाहिराती या दिवसा न दाखवता फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच का दाखवाव्यात? असा रोकठोक सवाल राजस्थान उच्च न्यायालयाने केंद्र सरकारपुढे उपस्थित केला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमच्या जाहिराती दिवसा दाखवण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर केंद्र सरकारवर समाज माध्यमातून मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे याप्रकरणी उच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे.

Loading...

याआधी टीव्ही सुरू असताना अचानक कंडोमची जाहिरात लागली आणि ती मुलांनी बघायला सुरुवात केली की वयस्कांना प्रचंड अवघडल्यासारखं होतं, या जाहिरातींचे मुलांवर वाईट परिणाम होतात, या जाहिराती बघून मुलं पालकांना हे काय आहे? असे प्रश्न विचारायला लागतात अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या जाहिराती दाखवायच्या असतील तर त्या रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच दाखवू शकता असे आदेश या मंत्रालयाने जारी केले होते. उच्चन्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह केंद्र सरकारचे मुख्य सचिव व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव यांनाही नोटीस जारी केली आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...